भीषण रेल्वे अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्याने दोन लोको पायलटचा मृत्यू
Jharkhand News: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या आहे यामध्ये चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये मंगळवारी मोठा रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या साहिबगंजमध्ये दोन मालगाड्यांची टक्कर झाली आहे. कोळशाने भरलेल्या मालगाडीने रिकाम्या मालगाडीला धडक दिली. या अपघातात दोन लोको पायलटसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही संपूर्ण घटना साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या फरक्का-लालमाटिया एमजीआर रेल्वे मार्गावर घडली. फरक्का येथून येणारी रिकामी मालगाडी बारहेत एमटी येथे उभी असताना लालमाटिया येथून कोळशाने भरलेल्या थ्रीपास मालगाडीने जोरदार धडक दिली. ही घटना पहाटे साडेतीन वाजताची आहे. या भीषण रेल्वे अपघातात दोन लोको पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचवेळी या अपघातात चार ते पाच रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींवर सध्या सामुदायिक आरोग्य केंद्र, बारहेत येथे उपचार सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik