गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 20 मार्च 2022 (16:15 IST)

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी आज सनई-चौघडे वाजणार आहे. यांची कन्यारत्न श्रेया महाजन हिचा विवाह आज जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे आयटी इंजिनियर आणि फूड इंडस्ट्रीचे मालक अक्षय अजय गुजर यांच्या सह जामनेरच्या हिवरखेडा येथे  होणार आहे. या ठिकाणी 14 एकराच्या जागेवर भव्य मांडव उभारले असून या विवाह सोहळ्याला एक लाख पदाधिकारी येण्याची शक्यता वर्तवली आहे. 

या भव्य विवाह सोहळ्यासाठी जय्य्त तयारी सुरु असून लग्नाच्या आधी हळदीचा सोहळा उत्साहात पार पडला. आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. लग्न साठी मंडप सजला असून हजारो लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय येणाऱ्या पाहुण्यासाठी वाहन ठेवायला उत्तम अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 

या विवाह सोहळ्यासाठी वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय मंत्रीसह राज्यातील अनेक मंत्री हजेरी लावणार आहे. या मध्ये देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, भारती पवार, भागवत कऱ्हाड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, जल संपदा मंत्री जयंत पाटील, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, अमृता फडणवीस आणि इतर अनेक नेते आणि मंत्री उपस्थित राहण्याचे समजले आहे. विवाह सोहळ्यासाठी हजारो वऱ्हाडी जामनेर येथे पोहोचले आहे. हळदीच्या सोहळ्यात आपल्या कन्येला गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी हळद लावली.