सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 21 मार्च 2022 (09:53 IST)

धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल-करुणा शर्मा

शिवशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा शर्मा यांनी आता थेट कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या  रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतची घोषणा करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरातून केलीय. यावेळी करुणा शर्मा यांनी, महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल’, असं वक्तव्य केले आहे.
 
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत करुणा शर्मा यांनी येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. ‘राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल’, असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलंय.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद मागील काही दिवसात प्रकर्षाने पुढे आलाय.