सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (12:05 IST)

सोने, चांदीचे दर घसरले

सोन्याचे दर घसरले आहेत. चीनमधील कोरोना विषाणूचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. मागणी कमी झाल्याने शुक्रवारी सोन्याचे भाव घसरले. त्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याच्या किंमतीत 222 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीही घसरल्या आहेत. एक किलो चांदी 60 रुपयांनी स्वस्त झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत आता 43,580 रुपयांवरुन 43,358 रुपये प्रती दहा ग्रामवर आलं.
 
त्याशिवाय, बुधवारी सोन्याचा भाव हा 43,502 रुपये प्रती दहा ग्राम होता. तर, मंगळवारी सोन्याचा भाव 43,564 रुपये प्रती दहा ग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,632 डॉलर प्रती औन्स आणि चांदी 17.25 डॉलर प्रती औन्स होता.