मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:32 IST)

सोन्याच्या दरात घसरण, तब्बल ६२५ रुपये झाले कमी

सोन्याच्या दरात  एकाच दिवसात सोने दर तब्बल ६२५ रुपयांनी कमी झाला आहे. सध्या  एक तोळा सोन्याचा दर हा ४२ हजार ९०४ रुपयांवर स्थिरावला. सोमवारी  सोन्याने या वर्षातला उच्चांकी दर गाठला होता. महत्त्वाचे म्हणजे मागच्या वर्षी आजच्याच दिवशी सोन्याचा दर होता ३३ हजार ३२१ रुपये. म्हणजे एका वर्षात सोन्याचा दर तब्बल १० हजार रुपयांनी वाढला आहे. देशातली बदलती आर्थिक स्थिती, अनेक आतरराष्ट्रीय घडामोडी, चीनमधील कोरोना व्हायरस यासारख्या अनेक गोष्टींमुळे सध्या सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही महिन्यात सोन्याचा दर ५० हजारांचा टप्पा गाठू शकतो असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. 
 
चांदीचे दरही १.६ टक्क्यांनी  घसरले असून, एक किलो चांदीची किंमत  ४८,५८० रुपये एवढी आहे. मागील पाच दिवसांत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ पहायला मिळत होती. सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव ४३,७८८ रुपयांवर गेला होता. त्यामध्ये आता ५८४ रुपयांची घसरण झाली. मागील दहा दिवसात सोने २१०० रुपयांनी महागले होते. तर चांदीतही ३००० रुपयांची वाढ झाली होती. .