1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (17:12 IST)

सोन्याला ऐतिहासिक भाव, ४३ हजार पार केले

gold price
देशाच्या इतिहासात सोनं पहिल्यांदाच प्रति 10 ग्रॅमसाठी ४३ हजार रुपयांच्या पार गेलं आहे. गुरूवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०० रूपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 43,170 रूपयांवर पोहचला. लग्नसराईचा मोसम आणि कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थैर्यामुळं सोन्याकडे वळलेली गुंतवणूकदारांची नजर यामुळे सोन्याचे भाव कडाडल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
 
बुधवारी मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम सरासरी ४५० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा भावही किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला. गुरूवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रूपयांची किंमत घसरल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
 
सोन्याच्या भावात मागील आठ दिवसांत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा भावांतही वाढ झाली आहे. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसांत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचा भावांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.