मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (13:22 IST)

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी विवाह बंधनात अडकल्याची चर्चा?

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’ या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली विवाह बंधनात अडकली आहे का? अशा चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहेत. सोनालीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
 
गुलाबी रंगाची साडी त्याला सुंदर दागिन्यांची जोड, नथ आणि सोनालीने घातलेलं उलटं मंगळसूत्र. हे मंगळसूत्र तिने उलटं का घातलं यावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे. तर तिच्या या फोटो एका चाहतीने कमेंट केली. ‘तुमचं मंगळसूत्र उलटं झालं आहे. यावर सोनालीने म्हटले आहे की, ‘लग्नानंतर काही दिवस उलटंच मंगळसूत्र घालतात’ त्यामुळे सोनालीचं लग्न झालं का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यावर सोनालीने अजूनतही काही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे तिच्या लग्नाचा पेच सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था सध्या नेटक-यांची झाली आहे.