रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2020 (16:38 IST)

आईला हनीमूनला सोबत घेऊन गेली मुलगी, जावयाचा सासूवर जडला जीव, लग्न केलं

मुलीचा संसार सुखाचा असावा अशी प्रत्येक आईची इच्छा असते. परंतू एक धक्कादायक बातमी अशी देखील आहे ज्यामुळे नातेसंबंधाचा पार विचका झाला आहे. कौतुकाने हनीमूनला जाताना पत्नीने आपल्या आईला सोबत घेतले. पण धक्कादायक म्हणजे हनिमूनला गेल्यावर जावई आणि सासूचे प्रेमसंबंधच जुळले आणि दोघांनी लग्नही उरकून टाकले.
 
ही घटना लंडनमधील घडली. ट्विकेनहम येथे राहणारी एक मुलगी लॉरेनचा नवरा लग्नाच्या दोन महिन्यांनी घरातून निघून गेला आणि काही दिवसाने त्याने बायकोच्या आईशी लग्न गेल्याची बातमी कळली. 
 
आपल्या आईला हनीमूनला सोबत घेऊन गेली होती. पण पतीला आपल्या सासूवरच प्रेम जडले त्यानंतर काही दिवसात त्याने पत्नीशी काडीमोड घेऊन सासूसोबतच संसार थाटला.
 
mirror.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील ट्विकेनहम येथे राहणाऱ्या 34 वर्षीय लॉरेनने अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये असलेल्या आपल्या प्रियकर पॉलसोबत लग्न केलं. लग्नाआधीच त्यांना एक मुलगा सुद्धा होता. लॉरेनने सांगितलं की, लग्नानंतर आम्ही हनीमूनला जाताना माझ्या आईला सोबत घेऊन गेलो. तेथे पॉल आणि आई ऐकमेकांच्या जवळ आले होते. परंतु, त्यांच्यात काही वेगळंच सुरु आहे याबद्दल मला संशय आला नव्हता.
 
परंतु, लॉरेनला तेव्हा धक्का बसला जेव्हा पॉल सासूसोबत राहू लागला. दुसरा धक्का तेव्हा बसला जेव्हा आई जूलीने पॉलच्या मुलाला जन्माला घातलं. नंतर दोघांनी लग्न देखील करुन घेतलं. सुरुवातील पॉल आणि तिच्या आईने आमच्या दोघांमध्ये काही सुरू नसल्याचं नाकारलं होतं. पण, जेव्हा मुलाला जन्म दिला तेव्हा आम्ही दोघांनी लग्न केल्याचं कबूल केलं. त्यानंतर संतापलेली लॉरेननं पॉलला सोडून दिलं.
 
लॉरेन म्हणते की मला जन्म देणार्‍या आईने आणि मी ज्यावर प्रेम आणि विश्वास ठेवला अशा नवर्‍याने मला धोका दिला, माझ्या आयुष्यातला हा सर्वात वाईट क्षण होता. जी आई आपल्या मुलीचाच संसार उद्ध्वस्त करते, की कोणत्याही माफीच्या लायक नाही. मी दोघांनाही माफ करणार नाही, असा संताप लॉरेनने व्यक्त केला.