बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मनालीमध्ये हनीमून साजरा करण्यासाठी अपहरण

लग्नानंतर हनीमूनला जाण्याची इच्छा प्रत्येक तरुणाला असते परंतू त्यासाठी कोणी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतं याची कल्पनाच करवत नाही. हनीमूनची तयारी करण्याच्या फिराकित आता कानपूरचा एक तरुण कोठडीत पोहचला आहे. 
 
कानपूर गावच्या पनकी गंगागंज रहिवासी अभिषेक मिश्रा उर्फ प्रांशु याचा विवाह शिवली क्षेत्रातील एका गावात ठरलं होतं. 29 मे रोजी प्रांशुची वरात निघणार होती. 
 
पोलिसांप्रमाणे लग्न ठरल्यावर तरुणाने आपल्या होणार्‍या पत्नीला कुल्लू मनालीला जाऊन हनीमून साजरा करू असा वादा केला. आपली गोष्ट राखण्यासाठी तो पैसे जोडू पाहत होतो आणि त्यासाठी त्याने एका मुलाचं अपहरण केलं. आपल्या आतोबा म्हणजे आत्याच्या नवर्‍याला मुलं आणून देण्याचा दीड लाख रुपयात करार केला. 
 
12 मे रोजी त्याने गावातील राजू सविता यांचा मुलगा विवेकचं अपहरण करून आपल्या गाडीने दिल्ली पोहचला.
 
तेथून आपल्या आत्याच्या नवर्‍याकडून 50 हजार रुपये घेतले, 35 हजार रुपये तो आधीच घेऊन चुकला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यावर असे गंभीर गुन्हा करणार्‍या व्यक्तीसोबत विवाह मोडणे हेच वधू पक्षाला पटले आणि त्यांनी ताबडतोब दहा दिवसात दुसरा मुलगा शोधन 28 मे रोजी मुलीचं लग्न लावून दिले. कानपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.