बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जून 2018 (17:10 IST)

दहशतवाद्याकडून जवानाचे अपहरण

जम्मू-कश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी समीर टायगरचा एन्काऊंटर करणाऱ्या एका जवानाचे अपहरण केले आहे.  पुलवामा जिल्ह्यात ड्युटीवरून घरी परतणाऱ्या औरंगजेब नावाच्या जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. हा जवान मुळचा पुंछ येथील आहे. औरंगजेब हा पुलवामा जिल्ह्यातील शादिमार्ग येथील ४४ राष्ट्रीय रायफल्सचा जवान आहेत. रजा मंजूर झाल्याने तो खासगी वाहनाने त्याच्या पुंछ जिल्ह्याातील गावी जात होता. त्याचवेळी शोपियन सेक्टरमध्ये त्यांची गाडी थांबवून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर ड्रायव्हरने याबाबत पोलिसांना कळवले. 
 
दरम्यान, शस्त्रसंधीचे निमित्त साधून रमजानच्या महिन्यात अतिरेक्यांनी दररोज हल्ले केले आहेत. २६ दिवसांत २५ हल्ले झाले आहेत. त्यामुळे शस्त्रसंधी वाढवण्याचा विचार करू नका, असा स्पष्ट इशारा लष्कराने केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.