गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

काय म्हणता, टिव्हीवरून दीपिकाच्या जाहीराती गायब

Deepika's announcement disappears from the TV
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. सध्या ब्रिटानीयाची गुड डे, लॉरियल,तनिष्क अशा काही ब्रॅण्डसह २३ जाहीरातींमध्ये दीपिका दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवरून दीपिकाच्या जाहीराती गायब आहेत. दीपिकाने जेएनयूत जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांनतर या जाहीरात कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता हा वाद मिटेपर्यंत या जाहीराती दाखवल्या जाणार नाहीयेत.
 
जाहीरात कंपन्यांनी दीपिकाच्या जाहीराती बंद केल्याचा फटका जाहीरातदार आणि दीपिकाला बसणार आहे. दीपिका असलेल्या जाहिराती कमी प्रमाणात दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.