रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (12:34 IST)

सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांना सामाजिक कलागौरव पुरस्कार जाहीर

भारतीय चित्रपट सृष्टीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांना भारतीय कला प्रसार अ‍ॅकॅडमी व द नॅशनल एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल ट्रस्ट सोलापूर यच्यातर्फे यंदाचा पहिला सामाजिक कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष गायक मोहम्मद अयाज यांनी पत्रकारपरिषदेत केली.
 
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या शनिवार, 11 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे या पुरस्काराचे वितरण सोलापूर विद्यापीठाच्या  कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त 'वर्षा रंग' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमातून जमा होणार्‍या होणारा निधी द नॅशनल एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल ट्रस्ट या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दिला जाणार असलचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. रियाज शेख, असिफ शेख, अकबर शेख आदी उपस्थित होते.