1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (17:55 IST)

#BrandedFakeer घालतात 1.6 लाखांचा चष्मा

#BrandedFakeer  PM Modi
2019मधील शेवटचे कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रयत्न करत होते. याचे याचे फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले. मात्र, काही जागांवर ढगाळ वातावरणामुळे हे सूर्यग्रहण दिसू शकलं नाही. पंतप्रधान मोदींनाही ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसला नाही.
 
सूर्यग्रहणाचे काही फोटोही मोदींनी शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदींनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी लागणारा खास चष्माही घेतला होता. मात्र आता या फोटोचे मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #BrandedFakeer हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 
 
मोदींनी घातलेल्या चष्म्याची किंमत 1.6 लाख रुपये असल्याची सांगितली जात आहे. एकाने ट्वीट करत लिहिले आहे की मोदींचा फकीरीशी त्याप्रकारेच नाते आहे ज्याप्रकारे अंबानी आणि गरीबीचे. एकाने लिहिले की कोणता फकीर दीड लाखाचा गॉगल घालतो.
 
मोदींनी रिप्लाय देखील केले आहे. मोदींनी उत्तर देत म्हटलं की, तुमचं स्वागत आहे. एन्जॉय करा. 
 
मात्र आता ट्विटरवर ट्रेंड होतोय पंतप्रधान मोदींचा चष्मा. ट्विटरवरील काही यूजर्स त्यांची बाजू घेताना देखील दिसत आहे की ते लहानपणी गरीब होते पण आता देशाचे पंतप्रधान असल्यामुळे  महागडा चष्मा खरेदी करण्याइतकी तर त्यांची आयपत आहेच.
 
मोदी समर्थक या लढाईत मागे नाही. त्यांनी पंडित नेहरुंचा फोटो ट्वीट केला ज्यात ते लेडी माउंटवेटन यांकरिता सिगारेट जाळताना दिसत आहे.