शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (09:42 IST)

विवाहबाह्य संबंधांसाठी डेटींग एपचा वापर वाढला

जवळपास आठ लाख भारतीय महिला आणि पुरुषांनी विवाहबाह्य संबंधांसाठी डेटींग  एपचा वापर केल्याचे उघड झालं आहे. याबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. यात जानेवारी महिन्यात या डेटींग एपमध्ये सर्वाधिक युजर्स नोंदवले गेले. तर 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात बंगळूरु, मुंबई, कोलकाता, पुणे, नवी दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, गुडगाव, जयपूर, चंदीगढ, लखनऊ, कोच्ची, विशाखापट्टनम, नागपूर, सूरत, इंदौर या ठिकाणाहून सर्वात जास्त युजर्सची संख्या नोंदवली गेली.
 
फ्रान्सच्या या एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग एपवर 567 टक्के वाढ नोंदविली गेली. त्यामुळे लग्नानंतर आपल्या पती किंवा पत्नीपासून वेगळे होऊन दुसऱ्या सोबत डेट करण्यास काहीही संकोच वाटत नसल्याचेही समोर येत आहे. नववर्षाच्या निमित्ताने या युजर्सच्या संख्येत वाढ झाल्याचे बोललं जात आहे.
 
विशेष म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या युजर्समध्ये डिसेंबरच्या तुलनेत तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जवळपास एका महिन्यातील 250 टक्के युजर्स वाढले. अशाचप्रकारे गेल्यावर्षी 2019 लाही युजर्स वाढल्याचे समोर आलं  होतं.