बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात भारत जगात दुसरा

अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. 2019 मध्ये तब्बल 19 अब्ज अ‍ॅप्स भारतीयांनी डाऊनलोड केले असल्याची माहिती अ‍ॅप अ‍ॅनीच्या अहवालात देण्यात आली आहे.
 
भारतीयांनी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण सन 2016 च्या तुलनेत तब्बल 195 टक्के वाढले आहे. ही वाढ जागतिक पातळीवर 45 टक्के आहे. याच कालावधीत प्रगत देश असलेल्या अमेरिकेत हे प्रमाण अवघे 5 टक्के आहे, तर चीनमध्ये सर्वाधिक 80 टक्के आहे. 2019 मध्ये जगभरातील 204 अब्ज ग्राहकांनी विविध अ‍ॅप्स डाउनलोड केल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 
4 पैकी 3 जण गेम्सच्या व्यतिरिक्त अन्य अ‍ॅप डॉऊनलोड करतात. हे प्रमाण तब्बल 95 टक्के आहे.  भारतात गुगल पे, अ‍ॅमेझॉन, एमएक्स प्लेअर आणि टिकटॉक हे अ‍ॅप्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.  
 
भारतीय लोक सरासरी 3.5 तास मोबाईलचा वापर करत असतात. विशेष म्हणजे जागतिक सरासरी 3.7 तास आहे. यात 30 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. जी जागतिक पातळीवर केवळ 10 टक्के इतकीच आहे.