शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 20 जानेवारी 2020 (13:26 IST)

व्हॉट्‌सअ‍ॅप डाउन; यूजर्सना फटका

इन्स्टंट मॅसेजिंगसाठी सर्वाधिक प्रमाणावर वापरले जाणारे व्हॉट्‌सअ‍ॅप सध्या डाउन आहेत. जगभरातील यूजर्सना याचा फटका बसत आहे. आयओएस आणि अँड्रोइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील यूजर्सना व्हॉट्‌सअ‍ॅप वापरण्यास अडचणी येत आहेत. फोटोज, जीआयएफ, स्टीकर्स, व्हिडिओ पाठवण्यात अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे व्हॉट्‌सअ‍ॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ, स्टीकर्स, अन्य फाइल्स डाउनलोड करण्यासही अडचणी येत आहेत.
 
फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्‌सअ‍ॅप भारतातील काही भाग, ब्राझीलमधील काही भाग, मध्य आशियातील काही भाग, युरोपमधील काही भाग आणि संयुक्त अरब आमिरातीच्या काही भागात डाउन आहे, अशी माहिती 'डाउनडिटेक्टर डॉट इन' या संकेतस्थळाकडून देण्यात आली. व्हॉट्‌सअ‍ॅप डाउन झाल्यावर यूजर्सनी ट्विटवरवर यासंदर्भातील ट्रेड सुरू केला आहे. तर अनेकांनी या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली.