मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जानेवारी 2020 (15:38 IST)

हे त्यांचे वैयक्तिक मत आहे : आदित्य ठाकरे

वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. 
 
कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतो आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा असा सल्लाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता दिला आहे.