बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

घटस्फोटाचे कारण वाचून मुळीच विश्वास बसणार नाही

बिहारमधील पाटणामध्ये एका महिलेने पतीच्या घाणेरड्या सवयींना कंटाळून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या महिलेने पटण्यामधील बिहार महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन पतीविरोधात तक्रार केली आहे. माझा पती रोज दात घासत नसल्याने त्यांच्या तोंडातून घाण वास येतो, तसेच रोज अंघोळ करण्याऐवजी तो दहा दिवसांनी एकदा अंघोळ करतो, या सर्वाला मी कंटाळले आहे असं या महिलेने म्हटलं आहे.
 
सोनी देवी नावाची ही महिला वैशाली जिल्ह्यातील देसरी येथील नया गाव येथे राहणारी आहे. सोनीचे लग्न २०१७ साली मनीष रामशी झाले होते. मला पतीच्या या घाणेरड्या सवयींचा आणि राहणीमानाचा कंटाळा आला असून मला घटस्फोट हवा आहे असा अर्ज सोनीने आयोगाकडे केला आहे.