शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (10:24 IST)

शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये, जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील - आठवले

Ramdas Athavale
शिवसेना सध्या बार्गेनिंग पॉवरमध्ये असल्यानं त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.  
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या सगळ्याच मागण्या मान्य करणार नाहीत, पण काही मागण्या पूर्ण होऊ शकतील, असं आठवले म्हणालेत.
 
शिवसेनेच्या योग्य त्या मागण्या भाजपनं मान्य करून महायुतीची सत्ता लवकरात लवकर स्थापन करावी आणि सत्तेत रिपाइंला वाटा मिळावा, अशी मागणीही यावेळी आठवलेंनी केली.
 
दरम्यान, अरविंद सावंतांना केंद्रात आणखी चांगलं खातं बदलून मिळण्याची शक्यताही आठवलेंनी वर्तवलीय.