गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (10:53 IST)

सहा जिल्हा परिषदांमध्ये आज निवडणुक

राज्यात सहा जिल्हा परिषदांमध्ये आज निवडणुक होत आहेत. नागपूर, अकोला, वाशीम, नंदुरबार, धुळे आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. मतमोजणी बुधवारी होईल. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी झालेली नसली तरी निकालानंतर एकत्र येऊ शकतात.
 
भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात भाग घेतला. सर्वत्र प्रचारात त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रचारात सहभागी झाले होते. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीच किल्ला लढविला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास प्रत्येक तालुक्यांमध्ये भेटी दिल्या. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाशीम जिल्हा परिषदेसाठी चुरशीची निवडणूक होत आहे. नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्हा परिषदांमध्ये भाजपने ताकद लावली आहे.पालघरमध्ये सत्ता राखण्याचे आव्हान भाजप पुढे आहे. पालघरमध्ये भाजप, बहुजन विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.