मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 15 जानेवारी 2020 (10:32 IST)

रस्ते अपघातामध्ये मुख्यमंत्री यांच्या मेव्हणी जखमी,एक जण ठार

शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन करून परत येत असतांना झालेल्या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हणी अमृता शृंगारपुरे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये एक नातेवाईक ठार झाला आहे. तर तिघे प्रवासी जखमी झाले आहेत. 
 
चालकाला डुलकी लागल्याने वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून खाली कोसळली. घटनास्थळी सिन्नर ग्रामीण पोलीस दाखल झाले असून सर्व जखमींना तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमृता यांची प्रकृती चिंताजनक नाही. दरम्यान, अमृता यांचे नातेवाईक अजय विश्वनाथ कारंडे यांचा मृत्यू झाला असून मनिष मिश्रा आणि अमृता या जखमी झाल्या आहेत.