गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (16:18 IST)

निर्णय योग्यच, पण…

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलंय. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी ५ दिवसाचा आठवडा करण्याची केलली मागणी महाविकास आघाडी सरकारने मान्य केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. तर या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सुद्धा आपले मत मांडले आहे.
 
रोहित पवार म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण पोलीसानानाही कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलीस भारती करून कामाचे कमी करावेत अशी मागणी  केली आहे. ट्वीट करत त्यांनी राज्य सरकारकडे हि मागणी केली आहे. ” सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच पोलिसांनाही त्यांच्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलीस भरती करुन त्यांचे कामाचे तास कमी करण्याचा किंवा त्यांना अतिरिक्त कामाचा भत्ता देण्याचाही सरकारने विचार करावा.’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.
 
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच पोलिसांनाही त्यांच्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलीस भरती करुन त्यांचे कामाचे तास कमी करण्याचा किंवा त्यांना अतिरिक्त कामाचा भत्ता देण्याचाही सरकारने विचार करावा.