गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (11:04 IST)

'सर्जिकल स्ट्राईक'मधून पाकिस्तानला योग्य संदेश गेलाय - लष्करप्रमुख नरवणे

surgical strike
अण्वस्त्र मर्यादा न ओलांडता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक व्यवहार्य आणि प्रभावी मार्ग आहेत, जसं की सप्टेंबर 2016 साली करण्यात आलेलं सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा बालाकोट एअरस्ट्राईक असेल, असं भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले.
 
"भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनं महत्त्वाची कामगिरी बजावली. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला स्पष्ट संदेश गेला की, काहीही केलेलं खपवून घेतलं जाणार नाही", असं लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.
 
दरम्यान, यावेळी नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीबाबतही बातचीत केली. ते म्हणाले, "कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील हिंसा मोठ्या प्रमाणात कमी झालीय. कायदा व सुव्यवस्था चोखपणे बजावली जाईल."