शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

युट्युबवर ‘गोल्डीची हळद’ गाणं तुफान हीट

टिप्स मराठी या नव्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मराठी संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. युट्युबवर सध्या ‘गोल्डीची हळद’ हे नवीन गाणं तुफान गाजत आहे. या गाण्यात विनोदवीर भाऊ कदम झळकला आहे. विशेष म्हणजे भन्नाट गाणं आणि भाऊ कदमची डान्सिंग स्टाइल यामुळे हे गाणं लोकप्रिय होत आहे.
 
दरम्यान, याप्रमाणे अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत टिप्स नवीन गाणी घेऊन येणार आहे. तसंच गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्याला आवाज देणारे रजनीश पटेल टिप्सच्या अंतर्गंत लव्ह फिव्हर हे नवीन गाणं घेऊन येत आहेत. टिप्सच्या आगामी गाण्यांमध्ये सावनी रवींद्र, धृवन मूर्ती, निलेश पाटील, रुपाली मोघे, अभिषेक तेलंग संगीत विश्वातील या आघाडीच्या तरुण गायकांचा आवाज ऐकायला मिळणार आहे.