1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (12:07 IST)

अमृता फडणवीस यांचे ‘हॅलो’ गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल

amruta fadnavin
माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची किती आवड आहे हे सर्वांच माहित आहे. त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने इंग्रजी गाणं गायलं आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हॅलो’ असं या गाण्याचं नाव असून लिओनेल रिची याचं हे मूळ गाणं आहे.
 
या गाण्यामुळे नेटकरी पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांना ट्रोल करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना असं लिहिलं, अंधाराला अंधार नाही फक्त प्रकाश संपवू शकतो आणि रागाला राग संपवू शकत नाही फक्त प्रेम संपवू शकतं, असं म्हणतं त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.