मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)

मेगा मुलाखत, रितेश आणि जेनेलिया घेणार या माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखत

Riteish and Genelia to take interview with former chief minister
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने नांदेडमध्ये आयोजित ‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमात ही महाराष्ट्राची मेगामुलाखत रंगणार आहे. 14 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर ही विशेष मुलाखत घेतली जाणार आहे.
 
दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? करड्या शिस्तीचे भोक्ते असलेल्या ‘नानां’च्या हृदयाचा हळवा कोपरा कोणता होता? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीत मिळणार आहेत. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडेल.