सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (13:40 IST)

Google Maps मुळे बर्फ गोठलेल्या नदीत जाऊन पडला

कोणत्याही ठिकाणी पोहचण्यासाठी हल्ली गुगल मॅपची मदत घेणे अगदी सामान्य बाब आहे. गुगल सर्वात सोपा पर्याय शोधून देण्यात मदत करतं. मॅपद्वारे लोकं आपल्या ठिकाणी कोणाची मदत घेतल्याविना पोहचतात पण नेहमी हे योग्य ठरतं का?
 
अलीकडेच एक घटना उघडकीस आल्यावर गुगलवर अती विश्वास अडचणीत टाकू शकतो हे कळले. एका वेबसाइट्च्या बातमीनुसार उत्तर अमेरिकेतील एका व्यक्तीने केलेल्या दाव्याप्रमाणे गुगल मॅपमुळे तो बर्फ कोठलेल्या नदती जाऊन अडकला. तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते आणि मदतीसाठी जवळपास कोणीही नव्हतं.

मिनीपोलिस शहरातील या व्यक्तीने आपल्या हॉटेलला पोहचण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. मॅपने मिसिसिपी नदीतून रस्ता दाखवला परंतू नदी गोठलेली होती आणि त्यामुळे तो रस्ता फॉलो करताना अचनाक पाण्यात पडला. 
 
नंतर त्याने स्थानिक अग्निशमन दलाने त्याचा जीव वाचवला. यापूर्वीही मॅप्समुळे लोकं चुकीच्या ठिकाणी पोहोचल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.