रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

100 युनिट वीज मोफत याला हरकत नाही : थोरात

राज्यातील नागरिकांना 100 युनिट वीज मोफत देण्यास हरकत नाही असे, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
 
यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना येत्या वर्षभरात 100 युनिट वीज मोफत देण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन राऊत यांना फटकारले होते. राज्य सरकारने असले फुकटचे धंदे करू नयेत, असे खडेबोल सुनावले होते. वीजदरावर आकारण्यात येणार्‍या करात कपात करावाची झाल्‍यास राज्य सरकार किती भार सोसू शकते, हे पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही पवार यांनी म्हटले होते. मात्र, यानंतर आता थोरात यांनी नितीन राऊत यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. त्यामुळे  मोफत वीज देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचे दिसत आहे. राऊत हे अभ्यास करत आहेत. गरिबांना मोफत वीज देता येईल का, याचा अभ्यास ते करत आहेत. सध्या याची चाचपणी सुरु असून त्यामध्ये काहीच गैर नाही, असे थोरात यांनी सांगितले. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.