शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (16:10 IST)

मनसेची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा निघणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासास्थानाबाहेर मातोश्रीबाहेर मनसेने पोस्टरबाजी केली आहे.
 
अखिल चित्रे यांनी मातोश्रीबाहेर ही पोस्टारबाजी केली आहे. या पोस्टरमध्ये थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेश यांना हकलून देण्याचे आवाहन केले आहे. मनसेने मोर्चाती मोर्चेबांधणी ही चांगलीच सुरू केली आहे. मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्यावतीने बांगालदेशी घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर लावण्यात आलं आहे.
 
माननीय मुख्यमंत्री साहेब, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकलंलच पाहिजे, हीच आपली भुमिका असेल तर प्रथम आपल्याच वांद्रयातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असे आवाहन केले आहे.