शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (15:45 IST)

काय म्हणता, समलिंगी संबंधातून हत्या झाल्याचे उघड

डोंबिवलीत सूटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात उमेश पाटील (५३) यांची समलिंगी संबंधातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. आरोपी प्रफुल्ल पवार याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने अटक केली. आरोपी प्रफुल्ल पवार आणि मयत उमेश पाटील या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते.
 
काही दिवसांपूर्वी आरोपी प्रफुल्ल पवार याचा विवाह झाला. प्रफुल्लच्या लग्नानंतरही उमेश त्याच्याकडे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र प्रफुल्लने नकार दिल्यामुळे ‘तुझ्या बायकोला सगळं सांगेन’ अशी धमकी तो देत होता.
 
प्रफुल्ल आणि उमेश यांच्यामध्ये शारीरिक संबंधांवरुन बुधवारी रात्री जोरदार भांडण झालं. उमेशच्या नेहमीच्या धमक्यांना कंटाळून प्रफुल्लने त्याची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरला. डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ परिसरात झुडूपात टाकला होता.