मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:06 IST)

केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे : प्रकाश जावडेकर

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. त्याचाच पुनरुच्चार करत केंद्रीय  मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असा गंभीर आरोप  केला. 
 
दरम्यान, जावडेकर यांच्या विधानावर आम आदमी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी पक्षाने केली आहे.
 
जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. केजरीवाल भाबडा चेहरा करून 'मी दहशतवादी आहे का?', असा सवाल विचारत आहेत. त्याचे उत्तर होय असे आहे. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. मी अराजकवादी आहे, असे जाहीर विधान केजरीवाल यांनी केलेले असून अराजकवादी आणि दहशतवादी यात फारसा फरक नसतो, अशा शब्दांत जावडेकर यांनी निशाणा साधला.