शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (11:56 IST)

अतिरेकी बिर्याणी नव्हे; गोळ्या खात आहेत

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील सरकार आल्यापासून दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मोदी आल्यापासून दहशतवादी बिर्याणी नव्हे तर गोळ्या खात आहेत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 
 
दिल्लीच्या करावल नगर चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवरही निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमध्ये जे लोक दहशतवाद्यांचे समर्थन करत आहेत. तेच लोक आता शाही बागेत आंदोलने करत आहेत. आझादीच्या घोषणा देत आहेत, अशी टीका आदित्यानाथ यांनी केली. 
 
लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती ही बॅलेट आहे, बुलेट नाही. त्यामुळे तुम्ही बॅलेटधून केजरीवाल सरकारला धडा शिकवा, असे आवाहन करतानाच केजरीवाल सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. दरमन, योगी आदित्नाथ कालपासून दिल्लीच दौर्‍यावर आहेत. दिल्लीत त्यांच्या अनेक ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या असून प्रत्येक सभेतून ते केजरीवाल आणि काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी या 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.