सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:17 IST)

तर हॉरर सिनेमा, फडणवीस यांची टीका

महाविकासआघाडीचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, तर हॉरर सिनेमा आहे. जनतेला सध्या हाच हॉरर सिनेमा पाहावा लागत आहे, अशा शब्दात  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. याआधी अशोक चव्हाण यांनी आमचं तीन पक्षांचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर फडणवीसांनी जोरदार टीका केली.
 
सत्ता स्थापन करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून दिलं होतं का याचाही खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील होताना संविधानाच्या चौकटीत राहून काम करु असं पत्र सोनिया गांधींना लिहून दिल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.