शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (15:41 IST)

मुनगंटीवार यांचा अजित पवार यांना टोला

“नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सध्याच्या परिस्थितीवर तंतोतंत खरी ठरली आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या पैशांशी केंद्राचा दुरान्वये संबंध नाही. आपल्या राज्यामध्ये महानगरपालिका या स्वायत्त आहेत. महानगरपालिकेला स्वत:चं उत्पन्न वाढवण्याचा विशिष्ट कायदा आहे. मग यात केंद्राचा काय संबंध?”, असं म्हणत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
 
“राज्यातील महापालिका केंद्राच्या चुकीच्या धोरणाने डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर राज्याची दिशा ठरवू”, असे विधान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केले होते. याच विधानावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.