शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (16:34 IST)

संभाजी राजेंनी उपोषण करू नये : अजित पवार

सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात शनिवारी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे सारथी संस्थेच्या बाहेर उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहे. या संस्थेत भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. 
 
तसेच, संभाजी राजेंनी उपोषण करू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी सचिवांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. या बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी देखील यावे.