मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (16:29 IST)

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रीना अटक

मुंबईतील गोरेगावमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चाललेल्या सेक्स रॅकेट पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अभिनेत्रींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गोरेगावमधील संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली. त्यावेळी दोन अभिनेत्रीही तिथे सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली.
 
विशेष म्हणजे यापैकी एक अभिनेत्री ही ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाची एक्स गर्लफ्रेण्ड असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरी आरोपी ही उदयोन्मुख अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. डीसीपी डॉ. डी स्वामी यांच्या नेतृत्वात खोटा ग्राहक पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. पोलिसांनी आधी त्यांना बेड्या ठोकल्या, नंतर धाडीमध्ये पळून जाणारी अभिनेत्री रंगेहाथ सापडली.