शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (16:45 IST)

'तर' मनसेसोबत युतीचा विचार करु, फडणवीस यांचे भाष्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. “मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. जर मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात मनसेसोबतच्या युतीबाबत  विचार करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 
 
एका कार्यक्रमात मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने व्यापक विचार करतो. पण मनसेचे विचार वेगळे आहेत. मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात  विचार करु, पण सध्यातरी ही शक्यता वाटत नाही” असे सांगितले.