मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (12:03 IST)

शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज

प्रमुख उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीपासून उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना दूर ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे समजते.
 
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार विराजमान झाल्यानंतर देशातील प्रमुख उद्योगपतींसोबत पहिली अधिकृत बैठक होती. परंतू ही महत्त्वाची बैठक शिवसेनामय असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब हे या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही या बैठकीला हजर होत्या. मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह प्रमुख उद्योगपतींसोबत ही बैठक झाली. परंतू या बैठकीमुळे आघाडीतील घटक पक्षांची अस्वस्थता वाढली.
 
अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते असल्याने या बैठकीला त्यांची उपस्थिती अपेक्षित असून त्यांना दूर ठेवण्यात आल्यामुळे शरद पवार नाराज असल्याचे वृत्त आहे. ते आपली नाराजी उद्धव यांच्या कानावर घालणार असल्याचे देखील सूत्रांचे म्हणणे आहे.