संजय राऊतांची नवी मोहीम : 2022 मध्ये शरद पवार राष्ट्रपती?

sanjay raut
मुंबई| Last Modified मंगळवार, 7 जानेवारी 2020 (16:27 IST)
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका वठवलेले शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आता राष्ट्रपतिपदासाठी मोर्चेबांधणी करण्याचा कामाला लागले आहेत. 2022 मध्ये होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याच नावाचा विचार करावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. 2020 साली राष्ट्रपतिपदाच्या उेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आमच्याकडे आवश्यक तेवढे संख्याबळ असेल असा दावाही राऊत यांनी केला आहे. याबाबत लवकरच रणनीती आखली जाईल असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून मला वाटते की सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा विचार करावा, असे राऊत म्हणाले.

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये जाणार

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून पवार यांच्या नावाची मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार संजय राऊत हे लवकरच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यादरम्यान ते त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणार आहेत. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून एक व्यापक अशी योजना तयार केली जाईल असे राऊत
म्हणाले. शरद पवार यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही, अशा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात ज्येष्ठ नेते आहे आणि म्हणूनच त्यांचा
सन्मान झालाच पाहिजे, असे राऊत म्हणाले. पवार यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय कुशाग्रता पाहता त्यांना भारताचा घटनात्मक प्रुखपदावर बसवणे योग्य ठरेल, असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्ये पवार यांचे मोठे योगदान असल्याने पवार यांच्याप्रती राऊत यांची नैतिक जबाबदारी आहेच, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके

कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. कविता संग्रह * अक्षरबाग ...

आता ऑनलाइन व्यवहार करताना डेबिट- क्रेडिट 16 अंकी कार्ड ...

आता ऑनलाइन व्यवहार करताना डेबिट- क्रेडिट 16 अंकी कार्ड क्रमांक आवश्यक, RBI चा नवा नियम जाणून घ्या
ऑनलाइन व्यवहार करताना आता दरवेळी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा 16 अंकी कार्ड क्रमांक टाकणे ...

काय ताकद आहे हो, सावरकरांनी बायकोचा घेतलेला निरोप...

काय ताकद आहे हो, सावरकरांनी बायकोचा घेतलेला निरोप...
तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि ...

३ लाख शेतकऱ्यांनी भरली इतक्या कोटी रुपयांची थकबाकी

३ लाख शेतकऱ्यांनी भरली इतक्या कोटी रुपयांची थकबाकी
नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ऑक्टोबर २०२० मध्ये ...

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता कमी आहे. ...