संबंधित माहिती
- हर्षवर्धन श्रिंगला भारताचे नवे परराष्ट्र सचिव
- मुख्यमंत्री यांनी केली अधिकारी नियुक्तीला सुरुवात, विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- भारतीय वंशाच्या प्रीती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्री, साजीद जावेद अर्थमंत्रिपदी
- डी. राजाः CPIच्या सरचिटणीसपदी पहिल्यांदाच दलित व्यक्तीची नेमणूक
- मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना तडीपारीची नोटीस
सचिवांनो, फाइलवर शेरा मराठीतच लिहा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीत लिहिण्याची सक्ती केली आहे. शेरा मराठीत लिहिला नसेल तर फाइल परत पाठवली जाणार आहे,' अशी माहिती मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सरकारी व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.
त्यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच विभागाच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीतच लिहावा, असे सांगण्यात आले आहे. इंग्रजीत शेरा लिहिला असेल तर फाइल परत पाठविण्याची सूचना ठाकरे यांनी दिल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून सरकारने केंद्राला पत्र लिहिले आहे असेही त्यांनी सांगितले.
