आता कुठलाही वाद-विवाद नाही, समज गैरसमज झाले दूर
शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे आणि सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. सत्तार आणि खैरेंचे समज गैरसमज दूर झाले आहेत. यापुढे पक्षाच्या आदेशाप्रमाणे ते दोघेही काम करतील अशा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
झालेल्या सगळ्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. या सर्व विषयांवर चर्चा झालेली आहे. आता दोघांनाही एकत्र काम करण्याचं, पक्षाचे आदेश आणि पक्षाची शिस्त पाळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता कुठलाही वाद-विवाद नाही. असे एकनाथ शिंदे यांनी सांगीतले.