शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (12:10 IST)

अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा, शिवसेनेला मोठा धक्का

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘सत्तारांनी राजीनामा का दिला अद्याप समजले नाही.’ 
 
अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं. तसंच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यानं ते नाराज होते, असं सांगण्यात येत आहे. 
 
अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान देण्यार असल्याची त्यांना आशा होती. त्यांना शिवसेनेनं राज्यमंत्रिपद देण्यात आलं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं सत्तार नाराज होतो. परंतु खातवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर शिवसेनेकडून सत्तारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.