शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (16:05 IST)

'समजने वालोंको इशारा काफी हैं, धनंजय मुंडे यांचा भाजपला टोला

जेएनयू विद्यापीठात हल्ला झालेल्या विद्यर्थ्यांना मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी खंबीर पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या या भुमिकेवर धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रीया दिली आहे.  
 
आवाज दो हम एक है!
 
जेएनयू विद्यापीठात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलनाचे लोण पसरले आहे. युवा वर्ग अन्यायाविरोधात पेटून उठला आहे. लोकशाहीची खरी ताकद काय आहे हेच यातून स्पष्ट झाले असल्याचे मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. विद्यार्थ्यांची ही एकी पाहता 'समजने वालोंको इशारा काफी हैं...' असा टोलाही मुंडे यांनी भाजपला लगावला आहे.