डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील (एमआयडीसी) रस्त्यांचा रंग प्रदूषणामुळे चक्क बदलला आहे. एमआयडीसीला लागून असणाऱ्या या रस्त्यांवर गुलाबी रंगाचा थर साचल्याचे दिसत आहे. यावेळी रस्त्यालगत असणाऱ्या गटारांमध्येही मोठ्याप्रमाणात रसायने (केमिकल) आढळून आली. संपूर्ण परिसरात या रसायनांचा दर्प पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...