शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (10:28 IST)

आशिष शेलार शिवसैनिकांच्या निशाण्यावर, लावले वादग्रस्तं होर्डिंग

मुंबईत शिवसैनिकांनी भाजप आमदारआशिष शेलार यांचे वादग्रस्तं होर्डिंग भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले आहेत. भाजप नेते राज पुरोहीत यांच्या कार्यालयासमोरही आशिष शेलार यांचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. 
 
भाजप कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये अर्धनग्नं अवस्थेत दाखवण्यात आले आहेत. ज्य़ावरआ'शिषे' मे देख असं लिहिण्यात आलं आहे. याशिवाय 'राजकारणातील हि.. जाडा' अशी ओळही होर्डींगवर लिहिण्यात आली आहे. 
 
आशिष शेलार यांनी नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या एनआरसीविषयीच्या एका वक्तव्यावर शेलार यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत अनेकांचाच रोष ओढावून घेतला.