सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (16:43 IST)

सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या तरुणांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी या सर्व आंदोलनकाऱ्यांची बाजू समजून घेतली. आता सायंकाळी साडेचार वाजता बैठक घेणार असल्याची माहिती दिली.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी संसदेत असल्याने मला या आंदोलनाची कल्पना नव्हती. मात्र माध्यमांमधून मला याची माहिती मिळाली. त्यामुळे दिल्लीहून परत आल्यावर मी त्यांना भेटायला आले. आंदोलकांनी त्यांच्या प्रश्नाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्यासह याविषयावरील सरकारचे वकील यांची आज सायंकाळी साडेचार वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही बाजू ऐकून यावर मार्ग काढण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहिल.”असे सांगितले आहे.