1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (10:00 IST)

'बांगलादेशीनो चालते व्हा',पनवेलमध्ये मनसेचे पोस्टर

'Walking Bangladeshi'
पनवेलमध्ये 'बांगलादेशीनो चालते व्हा', असे सांगणारे पोस्टर पाहायला मिळत आहेत. 9 फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर पनवेल परिसरात मनसेने बांगलादेशींना जाहीर आव्हान दिले आहे. 
 
बनावट डॉक्युमेंट बनवून पनवेल आणि परिसरात बांगलादेशी राहत आहेत हे वारंवार समोर आले आहे. एका मराठी कुटूंबाला फसवून बांगलादेशी चक्क त्या कुटूंबात जावई झाला. मनसे हे कदापी सहन करणार नसल्याचे मनसे पदाधिकारी महेश जाधव यांनी सांगितले. तसेच पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने पडताळणी करावी आणि या बांगलादेशींची हकालपट्टी करावी नाहीतर आम्हाला खळ खट्याक शिवाय पर्याय नसल्याचेही जाधव म्हणाले.