मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (16:30 IST)

आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर  जाऊन भेट घेतली. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात तासभर खलबते झाली.

मनसे 9 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढत आहे. त्या अनुषंगाने या दोघांमध्ये चर्चा झाल्याची चिन्हं आहेत. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावरुन वाटचाल सुरु केल्याने, भाजपशी जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली होती.