बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:39 IST)

1300 शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या

महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या अशी वस्तुस्थिती मांडतांना तावडे यांनी सांगितले की, राज्यात सुमारे 90 शाळा बंद झाल्या, त्या पण सरकारीशाळांमध्ये फक्त दोन ते तीन मुले शिकत होती, त्या शाळांमधील मुलांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये विलिन करुन प्रवेश देण्यात आला व त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यात आले. परंतु केजरीवाल मात्र खोटा प्रचार करीत आहेत व दिल्लीकरांची विनाकारण दिशाभूल करीत आहेत.
 
मी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे केजरीवाल यांनी धसका घेतल्याचे दिसते, असाही टोला त्यांनी लगावला.