मुंबई ते दिल्ली रस्ते वाहतूक अवघ्या 12 तासांत शक्य होणार
मुंबई ते दिल्ली हे अंतर अवघ्या 12 तासांत बाय रोड पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी 26 जानेवारी 2023 चा मुहूर्त असून, या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
मुंबई-दिल्ली या दोन शहरांत मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, ही बाब लक्षात ठेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावावा, असे गडकरी यांनी अधिकार्यांना सूचित केले आहे.
या एक्स्प्रेस-वेच्या कामांसाठी 40 टक्के कामे कंत्राटदारांना देण्यात आली असून, 50 टक्के कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच 85 ते 90 टक्के जागेचे भूसंपादन करण्यात आले असून काही टप्प्यात कामे सुरू करण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अघिकार्याने म्हटले आहे.